वेदान्त योग विद्या

आधुनिक जीवनासाठी प्राचीन ज्ञान

स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यावा आणि स्वतःला अधोगतीला जाऊ देऊ नये. कारण मनुष्य हा स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि स्वतःच स्वतःचा शत्रू आहे.

वेदान्त योग विद्या ही नाशिक स्थित स्वयंसेवी संस्था आहे जी वेदान्ताच्या प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानाचा प्रचार करते. वेदान्ताचे तत्त्वज्ञान मानवी परिपूर्णतेचे विज्ञान समजावून सांगते. हे ज्ञान जीवन जगण्याच्या शाश्वत तत्त्वांवर आधारित आहे. जे तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सुखशांती, सुसंवाद आणि यश मिळविण्यासाठी दैनंदिन व्यवहारात लागू केले जाऊ शकते. वेदान्त आपल्याला जगातील आव्हानांना तटस्थपणे सामोरे जाण्यासाठी सुसज्ज करते. सतत बदलणाऱ्या जगाशी संयमाने कसे जुळवून घ्यावे याबद्दल आपल्याला सुशिक्षित करते. तुमच्या, समाजाच्या आणि जगाच्या उन्नतीसाठी तुमचे आंतरिक व्यक्तिमत्त्व समजून घेण्यास आणि त्याचे योग्य व्यवस्थापन करण्यास मदत करते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वेदान्त तुम्हाला आत्मसाक्षात्काराच्या अंतिम ध्येयाकडे घेऊन जातो. ही तर्कशुद्ध शाश्वत तत्त्वे सर्वांना सारखीच लागू होतात. वंश, पंथ, संप्रदाय, धर्म किंवा जात अशा कोणत्याही मानवनिर्मित भेदांचा विचार न करता सर्वांना हे ज्ञान उपलब्ध करून देणे हा या संस्थेचा हेतू आहे.

"स्वतःमध्ये आनंद शोधणे कठीण आहे, परंतु ते कोठेही शोधणे अशक्य आहे."

-आर्थर शॉपनहॉवर.

आयुष्याचे निर्णय स्वतः घ्या, नशिबावर अवलंबून राहू नका.

वेदान्त योग विद्या काय करते

वेदान्त अध्ययन आणि अध्यापन करणे हा संस्थेचा उद्देश आहे.

सर्व सजीव सृष्टिमध्ये , एकट्या मानवाला बुद्धीचे वरदान दिले आहे , विचार करणे आणि कारणमीमांसा करण्याची क्षमता प्रदान केली आहे. परंतु मानवाला ह्याची जाणीव नसल्याने बुद्धिकडे दुर्लक्ष झाले, परिणामी सुखशांती व आंनंदी जीवनाचे रूपांतर संघर्षात झाले आहे. त्यासाठी मानवाच्या बुद्धीचे संवर्धन केले पाहिजे.ते फक्त वेदांताचे ज्ञानच करू शकते. वेदांत ज्ञान जीवनात सुखशांती, आनंद आणि समृद्धी प्राप्त करून मानवाला स्वावलंबी बनवते. जगावर अवलंबून न राहता जगणे एकट्या मानवालाच शक्य आहे परिणामी तो तणावमुक्त जीवन जगू शकतो. त्यामुळे निवड करणे हे तुमच्या हातात आहे. तेव्हा स्वतंत्र निवड करून जगा, संधीची वाट पाहू नका.

अभ्यासक्रम

Vedanta Courses Books

सर्व अभ्यासक्रम

भगवद् गीता

वेदान्त तत्त्वज्ञान आणि जीवनात त्याचा व्यावहारिक उपयोग स्पष्ट करणारा 18 अध्यायात 700 श्लोकांचा समावेश असलेला प्राचीन ग्रंथ.

द फॉल ऑफ द ह्यूमन इंटलेक्ट

हे पुस्तक समजावून सांगते की मानवाला त्याच्या जगण्यासाठी बुद्धीची गरज असते.जी इतर कोणत्याही प्राण्याला नाही. जीवनात तर्कशुद्ध विचार करण्याची आणि त्यानुसार कृती करण्याचा मार्ग ठरवण्याची क्षमता मानवाला आहे. त्यासाठी बुद्दीचा विकास करणे आवश्यक आहे.

VEDANTA TREATISE: THE ETERNITISE

वेदान्त ट्रिटाईज या ग्रंथात वेदान्ताचे प्राचीन तत्त्वज्ञान प्रस्तुत केले आहे. हे तत्त्वज्ञान जीवनाची आणि जीवन जगण्याची शाश्वत मूल्ये प्रतिपादित करते. जीवन जगणे ही एक कला, कौशल्य, तंत्र आहे. मानवी इतिहासात फारच थोड्या लोकांनी हे जाणले. तुम्ही एखादे वाद्य वाजवायला अथवा विमान उडवायला शिकून त्याचा सराव करता, त्याचप्रमाणे तुम्ही जीवन जगण्याचे तंत्र आत्मसात करून ते आचरणात आणणे आवश्यक आहे.

Treatise

फायदे

तणावमुक्त जीवन

आनंदाने काम करा दडपणाखाली नाही

कृती आणि शांतता यांचा मिलाफ साधा

नातेसंबंधामध्ये सुधारणा आणि योग्य पालकत्व

तरुणांना जीवनाची मार्गदर्शक दिशा

स्वावलंबन प्राप्ती

समस्यांवर मात करून मनःशांती मिळवणे

जीवनातील तटस्थता

What do humans seek in life?

वेदान्त देते

Peace Of Mind

मन:शांति

Prosperity

समृद्धी

Success

यश

Marathi