आजचे युग वेगवान जागतिकीकरणाचे युग आहे. प्रत्येकाला काही ना काही त्वरित मिळ्वण्याची घाई आहे. त्यामुळे माणूस समाधानी नाही. अशा असमाधानी वृत्तीतून अनेकांची नैराश्याकडे वाटचाल चाललेली दिसते. आपण करत असलेल्या कामावर श्रद्धा / विश्वास नसल्याने काम पूर्ण केल्याचे समाधान मिळत नाही. कामाच्या समाधानापेक्षा भरपूर पगार आज सर्वांची गरज बनत चाललीय. प्रत्येक गोष्ट सहज आणि कमी श्रमात मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. पण कष्टाला पर्याय नसतो. श्रमाशिवाय काहीही मिळत नाही. हाताला चटका बसल्याशिवाय भाकर मिळत नाही हे बहिणाबाईंनी सांगितले आहे.
“अरे संसार संसार
जसा तवा चुल्हयावर
आधि हाताला चटके
तवा मिळते भाकर.”
कामाच्या ताणतणावाखाली जगणार्यांना वेदांत उत्तम मार्ग दाखवणारा मार्गदर्शक आहे.
वेदांत सांगतो ———निसर्गाकडे बघा—-
निसर्ग मनुष्य सोडून बाकीच्या सर्व प्राणिमात्रांची काळजी घेत आहे . त्यांची जीवनशैली निसर्गाने ठरवून दिलेली आहे. जसे गाय कधीच मांसाहार करत नाही. किंवा वाघ हा कधीच शाकाहारी होणार नाही. निसर्गाने त्यांच्या सर्व सवयी व त्यांचे संपूर्ण जीवन ठरवून दिलेले आहे. आपण कधी बघितले आहे का?एक चिमणी जाड आहे तर दुसरी बारीक…. नाहीना. पण मात्र माणूस तेवढा बारीक किवा जाड असतो…असे का ??? निसर्ग सर्व प्राणिमात्रांची काळजी घेत आहे. तसेच निसर्गाने मानवाची पण अप्रत्यक्षपणे काळजी घेतली आहे. ती म्हणजे, फक्त आणि फक्त मानवालाच बुद्धी नामक साधन प्रदान करून. कोणत्याही प्राण्याला कर्म निवडण्याचे स्वातंत्र्य दिले नाही, पण फक्त मानवाला दिले आहे. आणि ते केवळ बुद्धी प्रदान केली आहे म्हणून. परंतु दुर्दैवाने हे कोणालाही माहीत नाही. तसेच बुद्धीचा विकास करायचा असतो हे पण माहीत नाही. त्यामुळे आपण जिथे आहोत तिथेच राहतो आणि जगातील कोणतेही आव्हाने स्वीकारण्याला असमर्थ ठरतो. अगदी छोटासा वादविवाद झाला तरी त्याला आपण सामोरे जाऊ शकत नाही….कारण आपली विचार करायची क्षमता आपण हरवून बसलो आहे.
*वेदान्त तुम्हाला ह्याचीच जाणीव करून देतो आणि बुद्धीचा विकास कसा करावा ह्याबद्दल शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन पण करतो